अवयवदानासाठी पुढाकार घेतलेल्या कोमल न्यू लाईन फाऊंडेशनचे प्रमुख धीरज गोडसे यांना आडकर फौंडेशनतर्फे पहिला कोमल पवार स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, व्याख्याते विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते सोमवारी (दि. २८) प्रदान करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षपदावरुन डॉ. पाटील बोलत होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर हे व्यासपीठावर होते. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. पाटील म्हणाले, अवयवदान करताना, करवून घेताना खूप अडचणी येतात. अवयवदानासाठी कुणी सहजासहजी तयार होत नाही. असाध्य रोगाने ग्रासलेल्या पत्नीसाठी गोडसे यांनी केलेल्या कायार्ला सीमा नाही. अवयवदानामुळे जीवदान मिळालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरील हास्य यापेक्षा दुसरी मोलाची गोष्ट नाही. अवयव दानासाठी धीरज गोडसे यांनी सुरू केलेले कार्य प्रशंसनीय असून, ते परमेश्वरी कार्यकर्ता आहेत.
विद्याधर अनास्कर म्हणाले, ज्या समाजाने मला काही दिले आहे, त्याला काय परत द्यावे असा विचार जेंव्हा मनात येतो तेंव्हा धीरज आणि कोमलने अवयवदानासाठी जनजागृतीचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
सत्काराला उत्तर देताना धीरज गोडसे यांनी पतीला पत्नीच्या नावाने पुरस्कार मिळणे ही मोठी गोष्ट आहे. आपल्या समाजात स्त्री नेहमी पतीच्या नावे ओळखली जाते. परंतु मला पत्नीच्या नावे हा पुरस्कार मिळतो आहे हे माझ्यासाठी आनंददायी असल्याची भावना व्यक्त केली.
ॲड. प्रमोद आडकर आणि मैथिली आडकर यांनी केले. सूत्रसंचालन आणि मानपत्र वाचन उद्धव कानडे यांनी केले.