खोर : दौंड तालुक्याच्या विविध विकासकामांसाठी महाराष्ट्र राज्याच्या सन २०१७-१८ या अर्थसंकल्पामध्ये सर्वांत जास्त निधी उपलब्ध झाला असल्याचे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले आहे.देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे ६ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी कुल बोलत होते. आमदार राहुल कुल म्हणाले, की दौंड तालुक्याचा दक्षिण भाग हा नेहमीच सिंचन योजनांच्या पाण्यापासून वंचित राहिला आहे.दौंड तालुक्यात सध्या होत असलेली विकासकामे ही चांगल्या प्रकारे व दर्जेदार पद्धतीने कशा प्रकारे केली जातील, याकडेदेखील जनतेने लक्ष देणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाप्रसंगी नामदेव बारवकर, डी. डी. बारवकर, अकबर शेख, भाऊसो शितोळे, संजय शितोळे, खोरचे सरपंच सुभाष चौधरी, विजय कुदळे, राहुल चौधरी, केशव बारवकर, खंडू टुले, मारुती कोकरे, अजय गवळी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दौंड तालुक्याला सर्वांत जास्त निधी : राहुल कुल
By admin | Published: March 31, 2017 11:58 PM