पुणे : गणेशाेत्सवात हलत्या देखाव्यांचे नागरिकांना प्रचंड अाकर्षण असते. विविध सामाजिक विषय घेऊन देखाव्यांच्या माध्यमातून प्रबाेधन करण्यत येत असते. या देखाव्यांसाठी पुण्यातील कसबा पेठेतील अापल्या वर्कशाॅपमध्ये सतीश तारु हे हलती चित्रे तयार करण्याचे काम करतात. गेल्या 45 वर्षांपासून अापल्या कलेच्या माध्यमातून तारु ही चित्रे तयार करत असून त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांना यात सहकार्य करत असते. देखाव्यांसाठीच्या चित्रांमध्ये तारु हे खऱ्या अर्थाने जीव टाकण्याचे काम करीत अाहेत.
तारु यांचे कसबा पेठेत वर्कशाॅप अाहे. या ठिकाणी शेकडाे चित्रे त्यांनी तयार केली अाहेत. वर्षभर ही चित्रे तयार करण्याचे काम ते करत असतात. त्यांना या कामात त्यांचे कुटुंब मदत करते. त्यांच्या पत्नी या चित्रांसाठी याेग्य कपडे शिवण्याचे काम करतात. तर त्यांचे इतर सहकारी चित्रांमध्ये मशीन बसवून ती हालत्या देखाव्यासाठी तयार करतात. या कामात तारु यांचा हातखंडा अाहे. त्याचबराेबर त्यांना गेल्या 45 वर्षांचा अनुभव अाहेच. अत्यंत सुबक चित्रे ते त्यांच्या वर्कशाॅपमध्ये तयार करतात. तारु हे स्वतः वेगवेगळ्या थीम निवडतात अाणि त्याप्रमाणे चित्रे तयार करतात. अनेक मंडळे त्यांच्याकडे देखाव्यांसाठी चित्रे घेण्यासाठी येत असतात. यंदा प्लाॅस्टिक बंदी, तसेच गड किल्ल्यांचे संवर्धन या विषयांवर भर देण्यात अाला अाहे. त्याचबराेबर रंगभूमीवर गाजणारे नाटक अलबत्या गलबत्या या नाटकातील चेटकिणीचा माेठा पुतळाही तारु यांनी तयार केला अाहे. त्याचबराेबर पंतप्रधान नरेंद्र माेदींचे हलते चित्रही त्यांच्या या वर्कशाॅपमध्ये पाहायला मिळते.
तारु म्हणाले, गेल्या 45 वर्षांपासून मी ही चित्रे तयार करत अाहे. सध्या मांडवांची लांबी कमी झाली असल्याने हलते देखाव्यांचे प्रमाण काहीसे कमी झाले अाहे. परंतु ग्रामीण भागात हे देखावे अात्ताही माेठ्याप्रमाणावर हाेत असतात. ग्रामीण भागातून या चित्रांसाठी माेठी मागणी असते. अाम्ही एखादा सामाजिक विषय घेऊन चित्रे तयार करताे अाणि ती मंडळांना देताे. पुढे मंडळे स्क्रीप्ट तयार करुन त्याचे सादरीकरण करतात. वर्षभर अाम्ही ही चित्रे तयार करण्याचे काम करत असताे.