पुणे: राज्याच्या समाज कल्याण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्याचा गुरूवारी अंतिम (दि.१५) दिवस आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा,असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच अद्याप ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्क्म जमा झाली नाही; त्यांना मार्च अखेरपर्यंत लाभाची रक्कम दिली जाईल,असेही समाज कल्याणच्या वरिष्ठ अधिका-यांकडून सांगितले जात आहे. राज्यात मागासवर्गीय मुलांसाठी ४४१ शासकीय वसतिगृह असून त्यापैकी मुलांची २३४ आणि मुलींची २०७ वसतिगृह आहेत. त्यापैकी २२४ वसतिगृहे शासकीय तर २१७ भाडेतत्त्वावरील इमारतीत आहेत. वसतिगृहातील मुलांची मान्य संख्या २१,६२० असून मुलींची मान्य संख्या १९ हजार ८६० अशी एकूण ४१ हजार ४८० आहे. परंतु, दिवसेंदिवस उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही. वसतिगृह न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शहरात राहून शिक्षण घेता यावे, उद्देशाने स्वाधार योजना सुरू करण्यात आली.मात्र,एकाही विद्यार्थ्याला योजनेच्या लाभाची रक्कम न मिळाली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणले. त्यावर समाज कल्याण विभागातर्फे येत्या १५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृह उभे करून त्यात प्रवेश देण्यात मर्यादा असल्याने अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,यासाठी स्वाधार योजना राबविली जात आहे.समाज कल्याण विभागाकडे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात ३ हजार ३६२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.त्यातील १ हजार ६८० विद्यार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे. तसेच ७६८ विद्यार्थ्यांचे बिल शासकीय कोषागारात ( ट्रेझरीत) आहे.तसेच २०१७-१८ वर्षासाठी ३ हजार ८६४ विद्यार्थी पात्र झाले असून त्यातील केवळ ३९ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र,अजूनही ३ हजार ५४९ विद्यार्थी योजनच्या लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.----------------------विद्यार्थ्यांना स्वाधारसाठी अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.मागील वर्षातील अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मार्च अखेरपर्यंत रक्कम दिली जाईल.तसेच येत्या यंदा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना निधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.तसेच सर्व विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत लाभाची रक्कम देण्यात दिली जाईल.- माधव वैद्य,सह आयुक्त, समाज कल्याण विभाग (शिक्षण)
स्वाधार योजनेचा गुरुवारी शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 9:33 PM
एकाही विद्यार्थ्याला योजनेच्या लाभाची रक्कम न मिळाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणले. त्यावर समाज कल्याण विभागातर्फे येत्या १५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली .
ठळक मुद्देवसतिगृह न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शहरात राहून शिक्षण घेता यावे, उद्देशाने स्वाधार योजना सुरू मागील वर्षातील अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मार्च अखेरपर्यंत रक्कम