पुणे : चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक ५ मधील प्रस्तावित जमिनीचे मूल्यांकन दरनिश्चितीसाठी बोलाविलेली अंतिम बैैठकही शुक्रवारी निष्फळ ठरली. ज्यांना जमिनी देण्याची इच्छा आहे, त्यांनाच बोलावले असूनही शेतकºयांनी जमिनीच देण्याच्याच नाहीत, तर दर कशाला सांगता अशीच भूमिका आजही घेतली.गेल्या महिन्यात ६ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत बैैठक झाली होती. या वेळी शेतकºयांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. जिल्हाधिकाºयांनी जमिनीचा गावनिहाय दर सांगण्यास सुरुवात केली असता शेतकºयांनी, आम्हाला आमच्या जमिनीच द्यायची नाहीत, तर जमिनीच्या दराशी आम्हाला घेणे देणे नाही. आमच्या जमिनीवरील पहिले शिक्के काढावेत, असे एकमुखाने सांगत विरोध केला होता.यामुळे प्रशासनाने दरनिश्चितीबाबत आज पुन्हा व अंतिम बैैठक बोलावली होती. ही बैैठक दोन टप्प्यात होणार होती. ज्यांना जमिनी देण्याची इच्छा आहे, त्यांनीच उपस्थित राहावे, असे आवाहन केले होते.या बैठकीला चाकण, वाकी खुर्द, रोहकल, बिरदवडी, गोनवडी, बोरदरा व आंबेठाण या गावांतील ज्यांची जमीन औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात येणार आहे, असे शेतकरी उपस्थित होते.या वेळी जमिनीचा दर सांगण्यास सुरुवात केली असता, उपस्थित शेतकºयांनी पुन्हा तीच भूमिका घेत गोंधळ करण्यास सुरुवात केली. जमिनीवरील शिक्के काढून आमच्या जमिनीचा सात-बारा कोरा करा, अशी मागणी लावून धरली.ज्या शेतकºयांनी आज सांगितलेला जमिनीचा दर मान्य आहे, त्यांनी तसे लेखी द्यावे. तसेच दराबाबत शेतकºयांच्या भावना वरिष्ठांपर्यंत सांगितल्या जातील. कोणाला जमिनी संपादनासाठी जबरदस्ती करण्यात येणार नाही, असे या वेळी अधिकाºयांनी सांगितले.बैैठकीला अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, भूसंपादन क्रमांक २६ चे शैलेश सूर्यवंशी अधिकारी उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे खेड तालुकाध्यक्ष जयप्रकाश परदेशी, राजेंद्र गायकवाड, बिरदवडीचे माजी सरपंच बाबासाहेब पवार, बाजार समितीचे संचालक राम गोरे, आंबेठाणचे माजी सरपंच अशोक मांडेकर, संजय गोरे, चाकणचेमाजी सरपंच नंदू गोरे, दशरथ काचोळे, दीपक मांडेकर, सचिन पडवळ,दत्तात्रय पडवळ, बिरदवडीचेसरपंच साहेबराव चौधरी, आदित्य परदेशी, सुरेश टाकळकर,रोहकलचे सरपंच अमृत ठोंबरे, सुदाम काचोळे, संतोष परदेशी, रामचंद्र मोहिते या शेतकºयांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
दरनिश्चितीची अंतिम बैठकही निष्फळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:42 AM