शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

कुकडीतून पिण्याच्या पाण्याचे शेवटचे आवर्तन, जूनमध्ये पाऊस न झाल्यास भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:54 AM

कुकडी प्रकल्पातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील धरणांमधून पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या तालुक्यातील नागरिकांना दिसाला मिळाला आहे

नारायणगाव  - कुकडी प्रकल्पातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील धरणांमधूनपुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या तालुक्यातील नागरिकांना दिसाला मिळाला आहे; मात्र हे शेवटचे आवर्तन असल्याने जूनमध्ये पाऊस न झाल्यास पाण्याच प्रश्न गंभीर होणार आहे. यावर्षीदेखील भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकरिता दि.२ मार्च २०१९ रोजी मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृहावर कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आ. दिलीप वळसे-पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्य अधिकारी जयश्री काटकर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता के. आर. कानडे आदी उपस्थित होते.या बैठकीत कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगे व डिंभे धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला होता. पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी पिण्यासाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. या आवर्तनाद्वारे कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ५ मार्च २०१९ रोजी पासून पाणी सोडण्यात येणार होते; मात्र डिंभा डावा कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने मीनाशाखा कालवा व घोडशाखा कालवा याद्वारे पाणी सोडणे शक्य झाले नाही. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करून ३५० क्युसेक्स वेगाने दोन्ही कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात आले.पिंपळगाव जोगा धरणातील आवर्तन पूर्ण झाल्यानंतर, मृत साठ्यातील पाणी येडगाव धरणात घेऊन ते पुढे कुकडी डावा कालव्याद्वारे पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांकरिता पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे. जुन्नर, आंबेगाव व पारनेर तालुक्यातील भागासाठी पिंपळगाव जोगा धरणातून डावा कालव्याद्वारे पाच मार्चला सोडण्यात आलेले पाणी पारनेर भागापर्यंत गेलेले आहे. डिंभा डावा कालव्यातून अकरा मार्चपासून घोडशाखा कालव्याला पाणी सोडण्यात आलेले आहे.या पाण्याचा लाभ जुन्नर तालुक्यातून पारनेर ते वडझिरे भागापर्यंत पिण्यासाठी होणार आहे. या पाण्याचे नियोजन कालवा समितीच्या निर्णयानुसार कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता जे. आर. कानडे व शाखा अभियंता जे. डी. गळगे यांच्यासह त्यांचे सहकारी करीत आहेत.तीन महिने आधीच आवर्तनजुन्नर तालुक्यातील येडगावपासून मंगरूळ, पारगावपर्यंतच्या नदीकाठच्या ग्रामपंचायतींनी पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होती. त्यामुळे १५ जुलै पर्यंतचे आरक्षित असलेले पाणी १३ मार्च रोजी सोडण्यात आले. तब्बल तीन महिने अगोदरच पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे यापुढे या भागासाठी पाणी सोडण्यात येणार नाही. येत्या उन्हाळ्यामध्ये आहे तेच पाणी ग्रामपंचायतीना काटकसरीने वापरावे लागणार असल्याचे स्पष्टीकरण पाटबंधारे विभागाने केले आहे.गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच पाणीजुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस ६३६३ द.ल.घ.फू. (२०.८४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १४३६४ द.ल.घ.फू. (४७.०४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.धरणांतील उपलब्ध पाणीसाठायेडगाव ८०४ द.ल.घ.फू (४१.३७ टक्के),माणिकडोह ११२० द.ल.घ.फू (११ टक्के)वडज २१३ द.ल.घ.फु (१८.१९ टक्के)पिंपळगाव जोगा ६१५ द.ल.घ.फू ( १५.८० टक्के)डिंभा ३६११ द.ल.घ.फू (२८.९० टक्के)

टॅग्स :DamधरणPuneपुणे