पुणे : रंगभूमीवर गाजत असलेल्या अमर फाेटाे स्टुडिअाे या नाटकाचा शेवटचा प्रसंग सुरु असताना अचानक प्रेक्षगृहतील एक दिवा फुटून त्याच्या ठिणग्या प्रेक्षकांच्या अंगावर पडल्याने एकच धावपळ उडाली. सुदैवाने यात काेणाला ईजा झाली नसली तरी सातत्याने घडणाऱ्या विविध घटनांमुळे कलाकारांच्या तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अाहे.
ही घटना 25 अाॅगस्ट राेजी अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात दुपारी 12.30 वाजता अमर फाेटाे स्टुडिअाेचा प्रयाेग सुरु असताना घडली. नाटकाचा प्रयाेग शेवटच्या टप्प्यात असताना अचानक प्रेक्षागृहातील एका दिव्यात स्पार्क हाेऊन त्याच्या ठिणग्या प्रेक्षकांच्या अंगावर पडल्या. कलाकारांनी ताबाेडताेब नाटक थांबवून प्रेक्षकांना बाजूला हाेण्यास सांगितले. त्यामुळे कुठला अनर्थ घडला नाही. त्याचबराेबर सातत्याने लाईट जात असल्याने नाटक अनेकदा थांबवावं लागल्याने कलाकारांचीही निराशा झाली. याअाधीही अनेकवेळा नाट्यगृहांमधील असुविधांबाबत प्रेक्षकांबराेबरच कलाकारांनी तक्रारी केल्या हाेत्या. नाट्यगृहांच्या स्वच्छेतेबराेबरच पार्किंगच्या समस्येबाबत वेळाेवेळी नाराजी व्यक्त करण्यात अाली हाेती. प्रशासन या तक्रारींकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र अाहे.
25 अाॅगस्टच्या प्रसंगाविषयी बाेलताना अभिनेता अमेय वाघ म्हणाला, अामचे अमर फाेटाे स्टुडिअाे हे नाटक शेवटच्या टप्प्यात असताना अचानक प्रेक्षकगृहातील एक दिवा फुटून त्यातून ठिणग्या पडल्या. त्यामुळे अाम्ही तात्काळ नाटक थांबवत प्रेक्षकांना तेथून बाजूला हाेण्यास सांगितले. नाटक सुरु असताना अनेकदा लाईटही गेल्याने नाटकात अनेक व्यत्यय अाले. असे अनुभव पुण्यातच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणच्या नाट्यगृहामध्ये अाले. एकेठिकाणी तर लाईटचा स्पाॅट फुटून खाली पडला हाेता. तर बाेरिवलीतील नाट्यगृहामध्ये साऊंड सिस्टीम याेग्यरित्या काम करत नसल्याने अाम्हाला त्रासाला सामाेरे जावे लागले हाेते. यावर प्रशासनाने उपाय करणे गरजेचे अाहे.
याबाबत बाेलताना नाट्यगृहाचे सहाय्यक व्यवस्थापक अरविंद भाेसले म्हणाले, अमर फाेटाे स्टुडिअाे नाटकाच्या प्रयाेगानंतर कलाकारांची अाेळख सुरु असताना प्रेक्षागृहातील एका हॅलाेजनची ट्युब फुटली. वीज प्रवाहाच्या उच्चदाबामुळे असे घडले असण्याची शक्यता अाहे. त्याचबराेबर त्या दिवशी त्या भागातील वीजपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे वारंवार लाईट जात हाेते. परंतु तातडीने जनरेटर सुरु केले गेल्याने नाटकाला व्यत्यय अाला नाही. लाईट गेल्यानंतर जितका वेळ जनरेटर सुरु हाेण्यास लागताे तितकाच वेळ अडचण अाली.