शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पेरणी-लागवड अंतिम टप्प्यात : बाजरी, नाचणीचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:05 AM

पुणे : खरिपाची पीक लागवड आणि पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, मका, उडीद, सोयाबीन पिकाने सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. तर, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, तीळ आणि सूर्यफुलाच्या क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. तूर आणि मुगाची सरासरी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.राज्यात ऊस पीक वगळून खरिपाचे १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र ...

पुणे : खरिपाची पीक लागवड आणि पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, मका, उडीद, सोयाबीन पिकाने सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. तर, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, तीळ आणि सूर्यफुलाच्या क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. तूर आणि मुगाची सरासरी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.राज्यात ऊस पीक वगळून खरिपाचे १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १३०.११ लाख हेक्टरवरील (९२ टक्के)पेरणी-लागवड उरकली आहे. राज्यात भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार २१७ हेक्टर असून, १२ लाख ५० हजार ८७८ हेक्टरवरील (८३ टक्के) लागवडीची कामे झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२६ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. खरीप ज्वारीचे सरासरी क्षेत्र ७ लाख १९ हजार ३७८ हेक्टरवरुन ३ लाख १० हजार ९९९, बाजरीचे क्षेत्र ८ लाख १० हजार ४६७ हेक्टरवरुन४ लाख ९३ हजार ३८ आणि नाचणीचे क्षेत्र १ लाख ८ हजार ९८६ वरुन ६४ हजार २२७ हेक्टर पर्यंत खाली आले आहे. तिनही पिकांच्या सरासरी क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. मक्याच्या सरासरी क्षेत्रात ७ लाख ३६ हजार ६६२ हेक्टरवरुन ७ लाख ७७ हजार ४४८ हेक्टरपर्यंत (१०६ टक्के) वाढ झाली आहे.तुरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ हेक्टर असून, ११ लाख ९२ हजार ५७३ हेक्टरवर (९६ टक्के), मुगाची ३ लाख ९७ हजार ४५० हेक्टरपैकी ३ लाख ९० हजार ५६ हेक्टरवर (९८ टक्के) पेरणी झाली आहे.उडीदाचे क्षेत्र ३ लाख १८ हजार ९५८ हेक्टरवरून ३ लाख ६२ हजार १७० हेक्टरपर्यंत (११४ टक्के) वाढले आहे. तीळाचे क्षेत्र ३० हजार ६५१ वरुन १२ हजार ८४१, कारळे २४ हजार ६८९ वरुन १० हजार १८७ आणि सूर्यफुलाचे क्षेत्र २७ हजार ९६३ वरुन अवघे ७ हजार २९४ हेक्टर पर्यंत आक्रसले आहे.भूईमुगाचे क्षेत्रही २ लाख ३७ हजार ५४ हेक्टरवरुन १ लाख ७९ हजार ६८६ हेक्टरपर्यंत खाली आले आहे. सोयाबीन ३५ लाख ५३ हजारांवरुन ३८ लाख ६३ हजारआणि कापसाचे क्षेत्र ४१ लाख ९१ हजारावरुन ३९ लाख ९४ हजारांवर गेले आहे.

टॅग्स :Puneपुणेagricultureशेती