लोणी काळभोर : पोलीस कर्मचाऱ्याने क्षुल्लक कारणांवरुन दोन जणांनी पोलीस हवालदाराला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधानपणा राखत स्वत:ला बाजूला केल्याने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. ही घटना लोणी काळभोरमध्ये घडली. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार फरार आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुणे ग्रामीण मुख्यालयात पाच वर्षांपासून कार्यरत असलेले पोलीस हवालदार संतोष मधुकर जावीर ( वय २८, रा. साई शांती अपार्टमेंट, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्याद लोमा कोळभोर पोलीस ठाण्यात मयूर विलास काळभोर व अक्षय आण्णा चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अक्षय चव्हाण याला अटक केली आहे. संतोष जावीर हे पोलीस मुख्यालयातून सुट्टी झाल्यावर दुचाकीवरून घरी परतत असताना २५ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते लोणी काळभोर गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरानजीक आले. रस्ता लहान व पुढे दोन लहान मुले चालत असल्याने त्यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला. दुचाकी बाजुला घेतली तरीही बुलेट पुढे घेता न आल्याने काळभोर याला त्याचा राग आला. त्याने जावीर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काळभोर याने रस्त्याच्या कडेला पडलेला मोठा दगड ऊचलून त्यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रसंगावधान राखून ते वेळीच बाजूला झाल्याने ते वाचले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी चव्हाण यांस ताब्यात घेतले आहे.
लोणी काळभोर येथे किरकोळ कारणांवरून पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:53 PM
दुचाकीवरून घरी परतत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला दोन आरोपींनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत जबर मारहाण केली
ठळक मुद्देप्रसंगावधानपणा राखत स्वत:ला बाजूला केल्याने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.