पुणे : ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन दसºयाच्या शुभमुहूर्ताआधी शनिवारी(दि़ १३) व रविवारी (दि. १४) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत गणेश कला, क्रीडा मंच, स्वारगेट येथे आहे. या प्रदर्शनाचे सिंडिकेट बँक हे बँकिंग पार्टनर आहेत.
या गृहप्रदर्शनाचा शनिवारी (दि. १३) १०.३० वाजता राजेंद्र जगताप (मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेन्ट कंपनी लि.,) यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून व राम कण्णन (क्षेत्रीय प्रबंधक, सिंडिकेट बँक) यांच्या विशेष उपस्थितीत होईल.दसºयानिमित्त आयोजित या प्रदर्शनात पुण्यातील व पिंपरी-चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १५० हून अधिक गृहप्रकल्प पुणेकरांना एकाच छताखाली पाहता येतील.
या गृहप्रदर्शनात अॅफोर्डेबल होम्स, लक्झुरियस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, रो-हाऊस, बंगलो प्लॉट्स, ओपन प्लॉट्स असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय ग्राहकांना पाहता येणार आहेत़ यामुळे या प्रदर्शनात वेळ व पैशांची बचत होईल. १८ आॅक्टोबरला दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. यामुळे या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ या प्रदर्शनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणेश कला, क्रीडा मंच या पुण्यातील सर्व भागांतून सहजतेने पोहोचू शकणाºया स्वारगेटसारख्या मध्यवर्ती ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आवाक्यात आलेल्या गृहकर्ज व्याजदरांमुळे, तसेच रेडी पझेशन प्रकारातील घरांवरील जीएसटीच्या सवलतींमुळे, अॅफोर्डेबल हाऊसिंग घरांच्या निर्मितीमुळे आगामी काळात पुणे बांधकाम क्षेत्राचे चित्र बदलत जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तरी, दसºयाच्या शुभमुहूर्तावर आयोजिलेल्या या गृहप्रदर्शनाला पुणेकरांनी भेट द्यावी आणि स्वप्नातील घर नक्की करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.