आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर धारीवाल यांनी हा उपक्रम देशभर राबविण्यास सुरुवात केली आहे. आकर्षक रचना, पाण्याची शुद्धता व तंत्रज्ञान अशी सोय असलेल्या आधुनिक ‘वॉटर कुलर’चे उद्घाटन नुकतेच शोभा धारीवाल यांच्या हस्ते पु .ल. देशपांडे उद्यान सिंहगड रोड पुणे येथे करण्यात आले. ‘पुलक प्याऊ’ हा उपक्रम जनतेसाठी खुला करण्यात आला. यावेळी शोभा धारीवाल म्हणाल्या की, हा उपक्रम पुलकमंच यांच्या सहकार्याने संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती, पुणे शहर व पुणे शहरातील बारामती, नीरा, लोणंद इत्यादी ठिकाणी सद्यस्थितीत ‘पुलक प्याऊ’ उभारण्यात आलेले आहे. संबंधित
शहरातील तापमान उन्हाळ्यात ४५ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. क्षारयुक्त, अशुद्ध पाणी पिल्याने पोटाचे विकार वाढतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्याचा आनंद वाटतो असे त्या म्हणाल्या. सिंहगड रोड वॉर्ड क्रमांक 30च्या नगरसेविका अनिता कदम यांनी आर एम डी फाऊंडेशनचे आभार मानले. यावेळी जैन महिला जागृती मंच शाखा पुणे अध्यक्षा वैजयंती शहा, ज्योत्स्ना जैन, मंजू शहा, उज्वला शहा, आभा मेहता, सुवर्णा शहा, ममता शहा, कल्पना मेहता, छाया गांधी, मनीषा शहा, सोनम गांधी, पद्मा शहा, त्रिशला पाटील, रेखा जैन, वीर कुमार शहा उपस्थित होते.
फोटो - आरएमडी फाऊंडेशन