शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

स्वामीनारायण मंदिराचे लोकार्पण

By admin | Published: February 20, 2017 3:04 AM

पुण्यातील मुंबई-बेंगळुरू महामार्गावर आंबेगाव बुद्रुक येथे २७ एकरच्या विस्तीर्ण परिसरात स्थापन करण्यात आलेल्या भगवान श्री

पुणे : पुण्यातील मुंबई-बेंगळुरू महामार्गावर आंबेगाव बुद्रुक येथे २७ एकरच्या विस्तीर्ण परिसरात स्थापन करण्यात आलेल्या भगवान श्री स्वामीनारायण मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मूर्तींची प्रतिष्ठापना बीएपीएस स्वामीनारायण सत्संग मंडळाचे प्रमुख महंत स्वामीमहाराज यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात पार पडला. लाखो भाविक मंदिर परिसरात उपस्थित होते.मंदिराच्या गर्भगृहात श्री स्वामीनारायण, अक्षरब्रह्म गुणातीतानंद स्वामी, श्री हरी कृष्ण महाराज, श्री राधा कृष्ण देव, श्री घनश्याममहाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नीलकंठ अभिषेक मंडपात श्री नीलकंठवर्णी महाराज व गुरुपंरपरांच्या मूर्तींसह विठ्ठल-रुक्मिणी, संत श्री ज्ञानेश्वरमहाराज, तुकाराममहाराज, एकनाथमहाराज, तसेच शिव-पार्वती, गणपती, सीता-राम-हनुमान, श्री लक्ष्मीनारायण देव, श्री बालाजी या मूर्तींची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर लोकार्पण सोहळा करून स्वामीनारायण मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानिमित्त भव्य नगर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मयूररथ सजवण्यात आला होता. मयूररथामध्ये श्री अक्षरपुरुषोत्तममहाराज, कळशरथावर घनश्याममहाराज, मुक्तीरथावर नीलकंठवर्णीमहाराज, छात्ररथावर हरिकृष्णमहाराज, बासरी-मोरपीसरथावर राधाकृष्ण देव, गजरथावर प्रमुखस्वामीमहाराज, हिमालयरथावर गणपती व हनुमान, अर्जुनरथावर विठ्ठल रुक्मिणी, मुक्त हस्तरथावर बालाजी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या मुर्त्यांचा समावेश होता. ही शोभायात्रा गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथून सुरू झाली. शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती मंदिर, बाजीराव रोड, शिवाजी रोड असे सुमारे ५ किलोमीटरचे परिक्रमण करीत शोभायात्रेचे पुन्हा स्वारगेट येथे आगमन झाले.(प्रतिनिधी)