करडे (ता. शिरूर) येथील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी बोलताना पवार पुढे म्हणाले की, ‘विकासकामे दर्जेदार होण्यासाठी स्थानिकांनी दक्ष राहिले पाहिजे. एखादे काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर ते थांबवा अशी निकृष्ट कामे नाही झाली तरी चालतील’ या वेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रवींद्र काळे, माजी उपसरपंच संतोष घायतडक, ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब वाळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी आमदार, तसेच जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ८७ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात झाला.
या वेळी शिरूर - हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर तालुका मार्केट कमिटीचे सभापती वसंतराव कोरेकर, उपसभापती प्रवीण चोरडिया, खरेदी - विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, सरपंच सुनील इसवे, उपसरपंच अंकुश बांदल, लंघेवाडीचे सरपंच संतोष लंघे, दतात्रय देशमुख, गणेश रोडे, आप्पासो वाळके, बबनराव वाळके, बाळासो वाळके, भास्कर वाळके, ग्रामसेवक राहुल बांदल यांसह मान्यवर उपस्थित होते .
फोटो : करडे (ता. शिरूर) येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी मान्यवर.