शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कायदा सर्वांसाठी समान, हे पोर्शे कार तपास प्रकरणाने सिद्ध केले - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 4:30 PM

अल्पावधीत आरोपींना ताब्यात घेतले, यावरून कायदा सर्वांसाठी समान असतो, याचे उत्तम उदाहरण आहे

पुणे : पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या पोर्शे प्रकरणानंतर पुणेपोलिसांनी ज्या गतीने व कार्यक्षमतेने तपास केला, अल्पावधीत आरोपींना ताब्यात घेतले, यावरून कायदा सर्वांसाठी समान असतो, याचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. कुणाची आर्थिक सत्ता, सामाजिक स्थान यांचे दडपण न घेता, कायद्यापुढे सर्वांना समान लेखण्याची ही कृती पोलिस यंत्रणा कार्यक्षम असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणारी ठरली, आणि टीकाकारांना उत्तर देणारी ठरली, असेही अमितेश कुमार म्हणाले.पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स, सिमेक्स, एसिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुरक्षित पुणे पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे बोलत होते. यावेळी सुरक्षित पुणे उपक्रमाचे ब्रॅँड अँबेंसेडर एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांची उपस्थिती होती.अमितेश कुमार म्हणाले,'कोणतीही यंत्रणा म्हणजे जादूची छडी नसते. पुण्यासारखे शहर ८० लाखांहून अधिक लोकवस्तीचे झाले आहे. अशा ठिकाणी दिवसाचे २४ तास दक्ष राहून पोलिस यंत्रणा आपले कर्तव्य बजावत असते. शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात काही घडले – बिघडले की पोलिस यंत्रणा तत्काळ कार्यान्वित होते आणि त्वरित घटनास्थळी पोहोचण्याच्या प्रयत्नात असते. पोलिसांना आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावता यावे, यासाठी आधुनिक साधने, सामग्री व तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. मात्र, शहरातील प्रत्येक नागरिकांचेही एक कर्तव्य आहे, ते म्हणजे दक्ष आणि सतर्क राहणे. आपल्या आसपास कोणतीही संशयास्पद हालचाल, कृती, व्यक्ती आढळल्यास त्वरित यंत्रणेला कळवणे, हे जबाबदार नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.अग्निशमन दलाचे प्रमुख पोटफोडे यांनी, पडद्यामागील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गौरव करत असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या शहरातील रस्ते, प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीची वस्ती, झोपडपट्ट्या, पुरेशी दक्षता न घेता उभारले जाणारे उद्योग यामुळे सुरक्षेला धोका उत्पन्न होत आहे. अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता असूनही दलाकडून सातत्याने प्रत्येक ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आपल्या कामाच्या जागा, उद्योगाच्या जागा व यंत्रणा पुरेशा सुरक्षित असल्याची काळजी संबंधित समाज घटकांची असल्याचे स्मरण प्रत्येकाला असावे, असेही ते म्हणाले. गोखले यांनी बाह्य व अंतर्गत सुरक्षा या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असतात, याची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे, असे सांगितले.यावेळी पोलिस दलासह अग्निशमन दलातील कार्यक्षम अधिकारी - कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव अमितेश कुमार, देवेंद्र पोटफोडे व भूषण गोखले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच हाॅटेल, शिक्षणसंस्था, काॅर्पोरेट, माॅल, बॅंक, वर्क स्पेस अशा विविध आस्थापनांत सर्वोत्कृष्ट सुरक्षेचे मानदंड प्रस्थापित करणाऱ्या संस्था, व्यक्तींना देखील गौरवण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेPorscheपोर्शेAccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी