पुणे : चोवीस तास वर्दळ असलेल्या लक्ष्मी रोडवरील दुकानाचे शटर उचकटून दुकानातील तिजोरी लंपास करण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला़ ही घटना सोमवारी रात्री साडेआठ ते मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली़याप्रकरणी उत्तमचंद चांदमल कटारिया (वय ७४, रा़ प्रभात रोड) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ कटारिया यांचे लक्ष्मी रोडवर आझाद क्लॉथ स्टोअर्स हे कपड्यांचे दुकान आहे़ सोमवारी सायंकाळी साडेआठ वाजता दुकान बंद झाल्यानंतर पहाटे चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला़ टेबलाचे डॉवर उचकटून त्यातील ५ हजार रुपयांची तिजोरी व तिजोरीतील ७५ हजार रुपये चोरून नेले़ मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजता लोकांना दुकानाचे शटर उचकटले असल्याचे दिसून आल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला़ दुकानात सीसीटीव्ही नव्हते़ जवळ असलेला सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले़शहरात घरफोडी करणाºया चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ उपनगरांमध्ये दररोज ३ ते ४ घरफोड्या होताना दिसत आहेत़ असे असताना शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या व नेहमी वर्दळ असलेल्या लक्ष्मी रोडवरील दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केल्याने आज व्यापारीवर्गात त्याची चर्चा होती़याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, या गुन्ह्याच्या तपासासाठी ४ स्वतंत्र पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे़ रात्री १२ ते पहाटे ५ या दरम्यान या भागात गस्तीसाठी २ जादा कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ याशिवाय बीट मार्शल, पेट्रोलिंग व्हॅनला सूचना देण्यात आल्या आहेत़
लक्ष्मी रस्त्यावरील दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 3:35 AM