Ajit Pawar: 'तुम्ही ७-८ दिवसांपासून होतात, तरी कुठे?'; पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार काय म्हणाले, पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:01 PM2022-11-11T12:01:54+5:302022-11-11T12:33:01+5:30
अजित पवारांनी गेल्या ७-८ दिवसांनंतर आज पुण्यातील मावळ मतदारसंघात एका सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली.
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या ७-८ दिवसांपासून पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. तसेच माध्यमांसमोरही आले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रसेचं मंथन शिबीर पार पडलं. या शिबीरात देखील अजित पवार अनुपस्थित राहिल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र आज पुन्हा एकदा अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय झाले आहेत.
अजित पवारांनी गेल्या ७-८ दिवसांनंतर आज पुण्यातील मावळ मतदारसंघात एका सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी अजित पवारांना गेल्या काही दिवसांपासून कुठे होतात?, असा प्रश्न विचारला. यावर मी आजारी होता. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. तसेच मी परदेशात एका खाजगी दौऱ्यासाठी गेलो होतो. मी पळून जाणारा नाहीय. मी नाराज असल्याची अफवा पसरवली जातेय, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. काहीही बातम्या सुरु होत्या, असं म्हणत अजित पवारांनी रंगलेल्या चर्चांना पूर्णविरोम दिला.
राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री, मा.श्री.अजितदादा पवार @AjitPawarSpeaks आपले मावळ तालुक्यात सहर्ष स्वागत.! pic.twitter.com/vtvgOcyClc
— Sunil Shelke (@shelkesunilanna) November 11, 2022
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते. मात्र, अजित पवार हे अनुपस्थित असल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. यावर राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलन केलं. विरोधकांनी अब्दुल सत्तार यांना धारेवर धरलं होतं. मात्र अजित पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच या संर्दभात एक ट्विटही केलं नाही. त्यामुळे आज अजित पवार यांनी आजारी असण्याचं कारण देणं, कुठेतरी न पटणारं आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"