'बोलताय काय भान ठेवा...; अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 05:16 PM2022-12-10T17:16:03+5:302022-12-10T17:18:13+5:30

गेल्या काही दिवासापासून भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा आज अजित पावर यांनी खरपूस समाचार घेतला.  

Leader of Opposition Ajit Pawar criticized BJP leaders | 'बोलताय काय भान ठेवा...; अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारले

'बोलताय काय भान ठेवा...; अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारले

Next

गेल्या काही दिवासापासून भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा आज अजित पावर यांनी खरपूस समाचार घेतला.  आज विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत, यावेळी एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली. भाजप नेते चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यपाल भगतसिंह राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली. 

 एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले, त्या आमदाराच बारामतीत डिपॉझीट जप्त केले आहे. अहो काय गोपीचंद तुम्हाला काय कळते की नाही, आमदाराचा कुठेतर तुम्ही मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करा, असा टोली अजित पवार यांनी लगावला. 

 यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. 'तुम्ही पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघराचे पालकमंत्री आहात. तुम्ही तुमची पण बदनामी करता आणि आमची पण बदनामी करता, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

काहीजण चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे आपण पाहत आहे. नवीन सरकार येऊन सहा महिने झाले आहेत. आम्ही म्हटल यांना काम करुदे, पण गेल्या सहा महिन्यापासून फक्त गरळ ओकण्याच काम करत आहेत. महारा्ष्ट्राची पंरपरा काय आहे. आपण वागतोय काय याच भान ठेवलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले. 

Toll Tax New Rule: हायवेवर प्रवास करणाऱ्यांची चांदी, MP मध्ये लागू झाले टोल-टॅक्सचे नवे नियम; या लोकांना मिळणार सूट!

'रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिका योजना होती. त्या काळात त्यांना काही लोकांनी जमीन दिल्या. तर काही लोकांनी खोल्या बांधून दिल्या. म्हणजे काय त्यांनी भीक मागितली ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागितली का? असा सवाल अजित पवार यांनी केला. 

Web Title: Leader of Opposition Ajit Pawar criticized BJP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.