महाराष्ट्र शासनाने राज्यातील जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांची नुकतीच निवडी जाहीर केल्या आहेत. सत्तेत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी असून जिल्हा नियोजन समितीवर या तीनही पक्षांच्या नेत्यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे तोच नियम लावून पुरंदर तालुक्यातील तिघांची या समितीच्या सदस्यपदी निवड केली आहे.
पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्यासह पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिकराव झेंडे पाटील त्याच प्रमाणे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना नेते माणिकराव निंबाळकर या तिघांची पुरंदर तालुक्यातून पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. शासनाने या तिघांची नावे जाहीर केली आहेत. सध्या तालुक्यात कॉंग्रेस पक्षाचे संजय जगताप हे आमदार आहेत.त्यांच्याकडे तब्बल चार महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. यामध्ये तालुक्याचे आमदारपद, जिल्हा बँकेचे संचालक, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आता जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यपदी निवड झाली आहे.त्यामुळे त्यांची पक्षीय पकड घट्ट होवून कार्यकर्त्यांना न्याय देता येईल.
राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही सत्तेच्या काळात अनेकांना संधी दिल्याने ग्रामीण भागात कार्यकर्ते निर्माण झाले. परंतु तालुक्यात सत्ता नसल्याने पक्षाला काहीशी मरगळ आलेली दिसून येत आहे. त्यामुळेच माणिकराव झेंडे पाटील या अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातून पुन्हा झळाळी देण्याचा प्रयत्न आहे.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी होती. त्यामुळे तालुक्यात पक्षांचे भक्कम जाळे निर्माण झाले. या काळात शिवतारे यांचे खंदे समर्थक असलेल्या माणिक निंबाळकर यांनी पक्षवाढीसाठी चांगले काम केले होते.त्यामुळे त्यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे.
बातमीसोबत फोटो ईमेल केला आहे.
१) संजय जगताप २) माणिकराव झेंडे पाटील ( दाढीवाला ) ३) माणिक निंबाळकर