लोकमत न्यूज नेटवर्करावेत : घर बचाव संघर्ष समितीने चिंचवडेनगर येथील दगडोबा चौकात आयोजित केलेल्या पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाच्या वेळी भाजपाच्या नेत्यांनी बाधित लोकांचे पुनर्वसन केले जाईल, असे विधान केल्यामुळे आंदोलकांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हे पाहता भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी आंदोलनाच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. मागील काही दिवसांपासून घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने रिंग रोडबाधित गुरुद्वारा, बिजलीनगर, बळवंतनगर, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव आदी भागातील हजारो घरे बाधित होत असून, त्याला विरोध करण्याकरिता विविध मार्गांनी आंदोलन करीत आहेत. आंदोलन पक्षविरहित आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे यांच्यासह स्वराज अभियान आदी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानावर बाधित प्रत्येक नागरिकाने आपल्या संवेदना, भावना, वेदना मुख्यमंत्र्यांना लिहून पाठवाव्यात. जेणेकरून मुख्यमंत्र्यांना या प्रश्नी लक्ष घालण्याकरिता भाग पडावे लागेल. प्रत्येक बाधित नागरिकाची संवेदना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचाउत्तम मार्ग म्हणजेच पोस्टकार्ड पाठवा आंदोलन आहे, असे घर बचाव संघर्ष समितीने या वेळी स्पष्ट केले. आंदोलनाच्या ठिकाणी प्रथमच चोख पोलीस बंदोबस्त होता.हजारो लोक आपले घर वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आदी सहभागी झाले होते.नेते म्हणतात, पुनवर्सन करूस्थानिक पातळीपासून ते केंद्रापर्यंत भाजपा आंदोलकांच्या सोबत आहे. काही मंडळी याबाबतीत राजकारण करीत आहेत. राजकारण करून प्रश्न सुटणार नाही. घर नावावर देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. जर का प्रस्तावित रिंग रोड रद्द झाला नाही, तर पुनर्वसनासाठी प्रयत्न करू, असे पवार म्हणाले.नागरिक म्हणतात, घरे वाचवापुनवर्सन करू असे म्हणताच नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘आमची हक्काची घरे वाचवा आम्हाला पुनर्वसन नको, हल्लाबोल हल्लाबोल, आमची घरे वाचलीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने भाजपाच्या नेत्यांनी काढता पाय घेतला.
आंदोलनातून नेत्यांचा काढता पाय
By admin | Published: July 10, 2017 1:54 AM