पुणे : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढण्याच्या संख्येत वाढ झाली. पुणे प्रादेशिक परीवहन कार्यालयाकडून (आरटीओ) यंदा ८४६ आंतरराष्ट्रीय वाहन परवाने देण्यात आले. यात सर्वात जास्त संख्या विद्यार्थ्यांची आहे. जवळपास सहाशे परवाना हे केवळ शिक्षणासाठी परदेश गाठणारे विद्यार्थ्यांनी काढले आहे.
परदेशात शिक्षण घेणारे, नोकरी व व्यवसाय करणाऱ्या पुणेकरांना परदेशात वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना अनिवार्य आहे. त्यासाठी पुणे आरटीओतून परवाना दिला जातो. यासाठी १ हजार रुपये शुल्क आकारणी होते. परवाना नूतनीकरणासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते.
बॉक्स १
मुदत वर्षाची :
आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यास एक वर्षाची मुदत आहे. मुदत संपल्यावर पूर्वी परवान्याचे नूतनीकरण केले जात नसे. आता नूतनीकरणास राज्य सरकारने परवानगी दिल्याने वाहनधारकांची मोठी सोय झाली आहे.
कोट :
“पुणे आरटीओकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय परवाने विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. या वाहन परवान्यांचे नूतनीकरण होणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी सोय होईल.”
-राजेंद्र पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे