पुणे : पुणे पदवीधर निवडणूक आणि मतदारसंघ राजकीय नेत्यांचा पुनर्वसन कार्यक्रम नाही. पदवीधरांचे नेतृत्व तरुणांनी करावे. मात्र आजपर्यंत पदवीधरांची दिशाभूल करण्यात येऊन सगळ्या पक्षांनी घराणेशाहीचा पुनर्वसनाचा कार्यक्रम राबविला आहे. असा आरोप करून ही निवडणूकीत आपलाच विजय होणार असा निर्धार संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांनी केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे उपस्थित होते.
.................
स्पर्धांमुळे घडतेे व्यक्तिमत्त्व : डॉ. बापट
पुणे : संगणक व मोबाईलचा ऑपचा वापर ज्ञान व अभ्यासासाठी करावा. सभा, वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेयला हवा. त्यामुळे व्यक्तिमत्त्व घडत असते. असे मत केसरी मराठा ट्रस्ट चे विश्वस्त डॉ. एस. जी. बापट यांनी व्यक्त केले.
सुसंगत फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत वाघमारे होते. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सु. भ. न्हाळदे, सतीश खाडे, माणिक सोनवलकर उपस्थित होते.