पुणे : देशभरात व समाजात तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली आहे. वेगवेगळ्या व्यसनांचे पाळेमुळे समाजात सर्वत्र पसरविले जात असल्याने त्यात तरुण पिढी वाहत चालली आहे. त्यामुळे राज्याने नवीन वर्षाला सामोरे जाताना व्यसनमुक्तीचा संदेश देत ३१ डिसेंबर ड्राय दे (कोरडा मद्यदिन) पाळण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघटनेने केली आहे.
अध्यक्ष विल्यम साळवी, डॉ. काशीनाथ बामणे, बी. आर. माडगूळकर, सनी वाघमारे, वंदना मोहिते, शमा सय्यद आदी व्यसनमुक्तीसाठी कार्य करीत आहेत.
----------
पालकांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक राहावे ; डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : पालक व शिक्षण संस्थानी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे. व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा, असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालक व संस्थाचालक यांच्या समवेत सोमवारी (दि. २८) ऑनलाइन बैठकीत त्या बोलत होत्या.
मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणे हा गंभीर गुन्हा असून त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा व तसे शिक्षण विभागाला कळवावे, अशा सूचना या वेळी गोऱ्हे यांनी दिल्या.
--------------
रक्तदान शिबिर
पुणे : श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले. या वेळी नगरसेविका डॉ. किरण मंत्री, डॉ. गौरव सोमाणी, डॉ. शामसुंद चांडक, जुगलकिशोर पुंगलीया, संतोष चोपडा, गोविंद मुंदडा, उमेश वाघ आदी उपस्थित होते.
--