पुणे : साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचे २८ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमरेंद्र भास्कर मराठी बाल कुमार साहित्य संस्थेच्या वतीने सभेचे आयोजन केले आहे. ही सभा येत्या बुधवारी (दि.१०) महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रसार समिती, शेवडे बोळ , शनीपारजवळ, बाजीराव रस्ता येथे सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे, ही माहिती कार्याध्यक्ष डॉ. दिलीप गरुड यांनी दिली.
----------
पोलिसांकडून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम
पुणे : खडक पोलीस स्टेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी अध्यक्ष श्रीकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, क्रांती पवार, नीलिमा पवार, हर्षवर्धन गोडे , आम्रपाली गाडे, अश्विनी पवार आदी उपस्थित होते.