म्हणजेच- “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”......... ‘कलाकार’.
‘कला आणि जीवन’ एक अतूट नाते आहे,
म्हणजेच....“LIFE IS ART - ART IS LIFE.” “कला हेच जीवन - जीवन हीच कला”
गायन, वादन, नृत्यकला, शिल्पकला, चित्रकला, हस्तकला अशा अनेक कला आहेत. आपल्याजवळ असलेला एखादा छंद, कला यामुळेच आपण आनंदी राहतो. माणसांमधील असलेली कोणतीही एक कला माणसाला आनंद देते, प्रसन्नही ठेवते, प्रोत्साहन देते, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविते, जीवनात आलेल्या एखाद्या दुःखातून आपल्याला बाहेर काढते. अशीच ही एक चित्रकला सर्वांना आनंद देणारी, स्मरणशक्ती वाढविणारी, एकाग्रता वाढविणारी, कल्पनाशक्ती वाढविणारी, कंटाळा घालविणारी, मनशांती वाढविणारी, प्रत्येक गोष्टीत कलात्मक दृष्टी पाहणारी, अशी ही चित्रकला आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणत असते.
मुलांच्या लक्षात काही राहत नसेल, अभ्यासाचे टेन्शन वाटत असेल, शिकवलेले समजत नसेल, सर्व विषयांचा गोंधळ, भीती वाटत असेल, अभ्यासाचे ओझे वाटत असेल तर यासाठी कल्पनाशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी उभ्या, आडव्या, तिरक्या, सरळ, वक्र इ. रेषा ओढाव्यात त्यामुळे तुमच्या हाताला सवय लागेल, वळण मिळेल यामुळे तुमचे हस्ताक्षर सुंदर होण्यास सुरुवात होईल चित्रकलेमुळे मन आनंदी होईल अभ्यास कंटाळवाणा वाटणार नाही, चित्रकलेमुळे एका ठिकाणी जास्त वेळ बसण्याची क्षमता वाढेल, अभ्यासाची गोडी वाढेल कोणताही विषय कंटाळवाणा वाटणार नाही. चित्रकला यामुळे तुम्ही आनंदी-कुटुंब आनंदी सभोवतालचे वातावरणही आनंदी राहील. चित्रकलेमध्ये प्रत्येक गोष्ट कलात्मक पाहणार, चित्रकलेमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असणार.
चित्रकलेविषयी मनापासून असलेली आवड आणि सातत्याने काम करण्याची प्रबळ इच्छा एवढ्याच भांडवलावर कुणीही रेखांकन (Sketching) ची सुरुवात करू शकतो. चित्रकलेचा श्रीगणेशा रेखांकनापासूनच सुरू होतो हातात खडू किंवा पेन्सिल आल्यावर कागदावर मारलेल्या मुक्त रेघोट्या ही रेखांकनाची सुरुवात असते.
सर्वच नामवंत चित्रकारांनी कलासाधनेत रेखांकनाची आवश्यकता मान्य केली आहे. सतत रेखांकन म्हणजेच स्केचिंग केल्याने चित्रकला सुधारते. नवनिर्मितीसाठी निरनिराळे विषय सुचू लागतात.
“मोजक्या रेषांनी समोरचे दृश्य रेखाटने" अशी रेखांकनाची एक सोपी व्याख्या केली जाते. सरावानेच आपली प्रगती टप्प्याटप्प्याने होत जाते. म्हणून कायम रेखाटन म्हणजेच स्केचिंग करीत रहाणे.
बालमित्रांनो, तुम्ही सुद्धा घरातच राहा आणि खूप छान छान चित्रे काढा व या सुट्टीचा सदुपयोग करा.
चित्रकार- श्री. राहुल सदाशिव पवार.
महिलाश्रम हायस्कूल, पुणे