शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

विज्ञानाचे कुतूहल निर्माण करण्यात शिक्षण अपयशी

By admin | Published: June 30, 2017 3:54 AM

‘शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानाची पुस्तके वाचली की भीती वाटते. इंग्रजी पुस्तकांचा शब्दश: अनुवाद करण्याच्या हव्यासामुळे विज्ञानाची पुस्तके क्लिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानाची पुस्तके वाचली की भीती वाटते. इंग्रजी पुस्तकांचा शब्दश: अनुवाद करण्याच्या हव्यासामुळे विज्ञानाची पुस्तके क्लिष्ट आणि रंजकतेच्या अभावामुळे रुक्ष झाली आहेत. वैज्ञानिकांची चरित्रे रंजक पद्धतीने सांगितली जात नाहीत. मूळात शिक्षकांनाच विज्ञानाचे मूलभूत ज्ञान नसल्याने विज्ञानाविषयीचे कुतूहल मुलांमध्ये निर्माण करण्यात शिक्षण व्यवस्था अपयशी ठरते आहे, अशी खंत विज्ञानविषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक निरंजन घाटे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात अर्चना जगदीश यांनी घाटे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मसापचे कार्यध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. घाटे यांच्या मुलाखतीतून त्यांचा अफाट ग्रंथसंग्रह, तो जमवताना आलेले अनुभव, लेखनाचा विलक्षण झपाटा, त्यातून साकारलेली १८५ पुस्तके, वाचकांचे अनुभव हा सारा प्रवास मुलाखतीतून उलगडला. घाटे म्हणाले, ‘बाबूराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथांचा मी चाहता होतो. त्यांच्यासारखे साधे, सोपे आणि वाचकांना गुंतवून ठेवणारे लिहिता आले पाहिजे, असे वाटायचे. कोयनेचा भूकंप झाल्यानंतर एका दैनिकाकडून लेखाची मागणी झाली. तो लिहिण्यासाठी कोयनेला गेलो. वाचनातून खूप विषय मिळत गेले. वृत्तपत्रातील स्तंभ लेखनामुळे मोठा वाचक वर्ग मिळाला. आधुनिक युगात विज्ञानाने गुंतागुंतीचे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यांना विज्ञान कथाकारांनी भिडले पाहिजे.’ मी बालभारतीच्या समितीवर असताना अनेक सूचना केल्या. त्या न पचनी पडल्यामुळे मलाच वगळण्यात आले, अशी टिपण्णीही त्यांनी केली. उद्धव कानडे यांनी आभार मानले. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.