रोटी, कपडा व मकान, रोटी म्हणजे अॅग्रीकल्चर, कापड म्हणजे टेक्सटाइल आणि मकान म्हणजे इंजिनियरिंग ह्या सर्वांबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. एरोनॉटिकल, एरोस्पेस, मरीन, रेल्वे, मेट्रो इंजिनिअरिंग अशा अनेक विविध शाखा इंजिनिअरिंगमध्येसुद्धा उपलब्ध आहेत. त्याचा विचार विद्यार्थ्यांनी व पालकांनी करावा. तसेच विज्ञान ह्या क्षेत्रात रबर, लेदर टेक्नॉलॉजी आणि वैद्यकीय अशा विविध शाखा आहेत. तसेच कला शाखेमध्ये भाषा, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, समाजकार्य, समाजशास्त्र, नृत्य, संगीत असे विविध विषय घेऊन पदवीधर होता येते. तसेच भारतीय लष्करात भूदल, हवाईदल व समुद्री दल यांमध्येदेखील अनेक संधी उपलब्ध आहे. जर तुम्हाला क्रीडा क्षेत्रात करियर करायचे असेल तर इव्हेंटर क्षेत्रात करिअर करू शकता. ज्यामध्ये राज्य आणि केंद्रीय शासनामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेमध्ये बी. कॉम., एम. कॉम., कंपनी सेक्रेटरी, उअ , टइअ फायनान्स, मार्केटिंग इत्यादी अनेक करिअरच्या शाखा उपलब्ध आहेत. तसेच परदेशी भाषा शिकून उदाहरणार्थ जर्मन, फ्रेंच, जापनीज ह्यामध्येसुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. या व अशा अनेक शैक्षणिक संधींबाबत तुम्ही वाचले अथवा ऐकले असेल, परंतु त्यात दडलेल्या नोकरीच्या व व्यवसायाच्या संधी देखील भरपूर आहेत. तरी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनों ह्याव्यतिरिक्त ही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
-डॉ. प्रदीप आठवले