गैरसमज आणि चुकीच्या माहितीच्या आधारे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. ही भीती दूर करण्यासाठी आणि सर्वसामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्यासाठी सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालयातर्फे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम इंग्रजी आणि मराठी अशा द्विभाषिक स्वरूपात सादर करण्यात येईल.
२० मे रोजी 'कोरोना : गैरसमज आणि वस्तुस्थिती', २१ मे रोजी 'कोरोना काळात गर्भधारणेशी सबंधित समस्या', 'कोरोना काळात लहान मुलांचे आरोग्य', 'मधुमेह आणि उच्च रक्तदाब' या विषयांवर चर्चासत्र होईल. २२ मे रोजी 'डोळ्यांची काळजी', 'होमिओपॅथीचे महत्व', 'आयुर्वेदाचे महत्व', 'कोरोना काळात घरात घ्यायची काळजी' या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. २३ मे रोजी 'पोस्ट कोविड काळजी' या विषयावर चर्चा होईल. अधिकाधिक नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राजीव येरवडेकर यांनी केले आहे.