शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
3
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
4
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
5
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
6
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
7
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
8
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
9
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
10
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
11
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
12
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
13
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
14
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
15
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
16
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
17
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
18
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
19
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
20
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप

आमदार, खासदारांना आश्वासनांचा विसर

By admin | Published: July 07, 2015 4:07 AM

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘शहराचे नेतृत्व करणाऱ्या तीन खासदार व तीन आमदारांनी शहरातील बेकायदा बांधकामे अधिकृत करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘शहराचे नेतृत्व करणाऱ्या तीन खासदार व तीन आमदारांनी शहरातील बेकायदा बांधकामे अधिकृत करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. शहरातील एकाही बांधकामाची वीट पाडू देणार नाही, असे ते निवडणुकीपूर्वी म्हणत होते. मात्र, आता त्यांना दिलेल्या शब्दांचा विसर पडला आहे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. ९) दुपारी एकला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत साठे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकाम प्रश्नावर आता काँग्रेस हल्लाबोल करणार असून, राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज पूर्ण माफ व्हावे व शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करावी या मागणीसाठी आंदोलन होणार आहे. त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम, पुणे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड सहभागी होणार आहेत. परिषदेस महिला शहराध्यक्षा ज्योती भारती, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, सेवा दलाचे संग्राम तावडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, शिक्षण मंडळ उपसभापती श्याम अगरवाल, विष्णू नेवाळे, गणेश लंगोटे, संदेश नवले, नरेंद्र बनसोडे, मयूर जैस्वाल उपस्थित होते.(प्रतिनिधी)