मुळशी तालुक्यातील एक उपक्रमशील ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळविलेल्या भूगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वात सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. गावातील ज्येष्ठ नागरिक हेच गावाचे खरे वैभव आहेत त्यांचा वृद्धापकाळ आनंदात जावा याकरिता येथिल ग्रामपंचायतीने गावाच्या बसस्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकांकरिता कट्टा बांधला आहे. त्याठिकाणी भिंतीवर ऐतिहासिक व अध्यात्मिक संदेश देणारी शिल्पे कोरली आहेत.
त्यानंतर भूगाव अंतर्गत असलेल्या माताळवाडी वाॅर्ड क्र.२ येथे ज्येष्ठांसाठी वाचनालय व विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उद्घाटनप्रसंगी भूगावच्या सरपंच निकिता रमेश सणस, सतीश इंगवले, विशाल भिलारे ग्रा. सदस्य सुरेखा शेडगे, अर्चना सुर्वे, वैशाली सणस, प्रभाकर सुर्वे, दिनकर शेडगे, दिलीप सुर्वे, निवृत्ती शेडगे, गुलाब सुर्वे, अंकुश सणस, दत्तात्रय शेडगे, कुलदीप शेडगे, नितीन शेडगे, विशाल सुर्वे, गिरीश सुर्वे आदी उपस्थित होते.
फोटो : माताळवाडी (भूगाव) ता. मुळशी येथे ज्येष्ठांसाठी सुरू करण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करताना.