पिंपरी : शहरात ठिकठिकाणी आंबा विक्रीसाठी परप्रांतीय आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाना आदी भागांतून नागरिक आंबे विकण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. गल्लीबोळात आणि चौकाचौकांत भरघोस प्रमाणात आंबे विकले जात आहेत. उन्हातान्हात, वादळी वाऱ्यातही आंब्याच्या विक्रीसाठी लोक वणवण भटकत आहेत. यामुळे आंब्याचा खप मोठ्या प्रमाणावर होत आहे.विक्रीसाठी आंबा पुण्यातून अथवा मुंबईतून आणला जात आहे. खप वाढल्यामुळे दिवसाला ५ ते १० हजार रुपयांचा फ ायदा किरकोळ विक्रेत्यांना झाला आहे. लोकवस्ती अथवा गर्दीच्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये आंबे विकले जात आहेत. असे आंबे विकणाऱ्यांचा एक गट बनला आहे. आंबे किरकोळ दराने दारोदारी विक्र ीस आणले जात आहेत. आंब्याच्या गुणवत्तेची खात्री मात्र नागरिकांनाच करून घ्यावी लागत आहे. आंबा महाग असतानाच सुरुवातीलाच या विक्रेत्यांनी जास्त प्रमाणात आंबा बाजारात विक्रीस आणला. काहींनी किंमती फुगवून सांगितल्या. मात्र, ग्राहकाने कमी किमतीला मागितल्यास या आंब्याचे दर त्वरित कमी केले गेले आहेत. सुरुवातीला आंबा दीड ते २ हजार रुपये डझन याप्रमाणे बाजारात विकला जायचा. मात्र, तेव्हा बाहेरील विक्रेते आंबा कमी दराने उपलब्ध करून देत. यामुळे नागरिकांना घरपोच आंबा उपलब्ध व्हायचा. आंब्याची विक्री मोठ्या प्र्रमाणात वाढलेली दिसून आली. आंबा पेट्यांमध्ये आणला जात आहे. (प्रतिनिधी)
आंबा विक्रीसाठी परप्रांतीय सरसावले
By admin | Published: May 15, 2015 5:23 AM