इंदापूर तालुक्यातील आगोती, चांडगाव, गंगावळण भागात या आगोदरच बिबट्या असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती मात्र वनविभागाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले होते. बुधवारी रात्री बिबट्यासदृश प्राण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मात्र नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी लोणी देवकर, पळसदेव, भावडी, चांडगाव, आगोती या भागातील नागरिक शेतात जाण्यासाठी धजावत नाहीत. यावेळी वन अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘वनविभागाच्यावतीने खात्री करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी रात्रभर आणि पहाटेही गस्त घालत आहोत. बिबट्या असल्याची अजूनही खात्री पटली नाही, व्हिडीओच्या क्वालिटीमुळे अचूक ओळखता येत नाही. परंतु धोका पत्करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन केले.
पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडताना बिबट्यासदृशप्राणी.
२९०७२०२१-बारामती-१२