ओतूर : दुचाकीवरून जात असताना येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घातली. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. अशोक सखाराम अहिनवे असे त्या शेतकऱ्याचे नाव असून ते ओतूरकडे येणाऱ्या रस्त्यालगच्या ओढ्यावर ही घटना घडली. ‘दुचाकीचा वेग वाढवून ते बिबट्याच्या कचाट्यातून सुटले. ‘दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो,’ असे अहिनवे यांनी सांगितले. या बिबट्याचा वावर अहिनवेवाडी, मांदारणे, पिंपळगाव जोगे कालवा या परिसरात आहे. गुजरेश्वर ओढ्यात तो अनेकांना आढळला आहे. या घटनेसंबंधी ओतूर वनक्षेत्रपालांना भेटून घडलेली हकीगत सांगून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी त्यांनी केली. अहिनवे म्हणाले, ‘‘नेहमीप्रमाणे शिवारातून मी रात्री ८ वाजता माझ्या शेतातून येत असता, गुजरेश्वर ओढ्याजवळ पूर्ण वाढ झालेला बिबट्या गाडीसमोर आला व डरकाळी फोडून दुचाकीला पंजा मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून गाडीचा वेग वाढवला म्हणून वाचलो.’’ (वार्ताहर)
दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
By admin | Published: February 05, 2016 2:16 AM