भोर तालुक्यातील भुतोंडेच्या परिसरात लोहाराचा माळ येथे शेतकरी शिवाजी कचरे व त्याची आजी जनावरे चारत होती. या वेळी अचानक झुडपामध्ये लपून बसलेल्या बिबट्याने झुडपातून बाहेर येऊन बैलावर हल्ला केला असता बैलाचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेची खबर भुतोंडे गावचे सरपंच अंकुश माने यांनी वनविभागाला दिली असता नसरापूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव, वनपाल अरुण डाळ, वनरक्षक एस. बी. साठे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बाधित शेतकऱ्यास लवकरात लवकर नुकसान भरपाई वनविभागाकडून मिळेल अशी माहिती वनपाल अरुण डाळ यांनी दिली.
बिबट्याचा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला बैल
छाया - स्वप्निलकुमार पैलवान