राजुरी : राजुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले असून आज पहाटेच्या सुमारास राजुरी येथील गोगडी मळ्यामधील सखाराम किसन औटी या शेतकऱ्याच्यातीन कालवडींवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी, बेल्हा, गुंजाळवाडी हया गावांमध्ये बिबट्याचे हल्ले वाढतच चालले आहे. चार दिवसांपूर्वी बेल्हा येथील आरोटे मळ्यामधील एका शेतकºयांच्या दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्या. काल राजुरी येथील दोन मळ्यांमध्ये बिबट्याने दोन कालवडी तसेच दोन शेळया व दोन मेंढ्या बिबट्याने मारून टाकल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पहाटे सुमारास मळ्यातील सखाराम औटी यांचा गायांचा गोठ्यात शिरत बिबट्याने एका वासराला ठार मारले. गायांचा मोठा आवाज आला असता ते धावत गोठ्याकडे गेले. यावेळी त्यांना बिबट्या वासरला मारून फरफटत नेत असताना दिसले. यावेळी औटी यांनी आरडाओरडा केला असता बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर औटी यांनी गोठ्यात पाहिले असता दोन कालवडी दिसल्या नाहीत. त्यांनी आजुबाजुला पाहिजे असता बिबट्याने गोठ्याला असलेल्या तारा तोडून जवळच असलेल्या गवतामध्ये दोन कालवडी मारून टाकल्या होत्या. या शेतकºयांच्या तीन कालवडी बिबट्याने मारल्याने त्या शेतकºयांचे जवळपास ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.दरम्यान, राजुरी या ठिकाणी बिबट्याने ज्या ठिकाणी हल्ला करून दोन कालवडी व शेळ्या मारल्या होत्या. त्या ठिकाणी पिंजरा लावण्यासाठीची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली असता वन विभागाने याची दखल घेत लगेचच पिंजरा लावला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, बोरी बुद्रक ही गावे बिबट्याप्रवण क्षेत्रात मोडतात. त्यातच तालुक्यात ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. यामुळे बिबट्याच्या लपण्याच्या जागा कमी होत असल्याने मानवी वस्तीमध्ये बिबटे येऊ लागले आहेत. वन विभागाकडे पिंजºयांची संख्या खूपच कमी असल्यामुळे संख्या वाढवावी, अशी मागणी वल्लभ शेळके यांनी केली आहे.खानेवाडीत बिबट्याने केल्या तीन शेळ्या फस्तयेडगाव : येडगाव येथील खानेवाडी परिसरातील शेतकरी महेंद्र बाबाजी नेहरकर यांच्या घरामागील गोठठ्यातील चार शेळ्या रात्री तीनच्या सुमारास बिबट्याने फस्त केल्या. तसेच आजूबाजूच्या घरांतील पाळीव कुत्री, शेळ्या, वासरे यांच्यावर देखील बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. वडगाव, कांदळी, गणेशनगर, भिसेमळा, बेंधमळा, नेहरवाडी या सर्व ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आला आहे. अगदी सायंकाळच्या वेळी देखील बिबट्या शेतकºयांना शेतात दिसला आहे. तसेच ऊस तोडणीस सुरुवात झाल्यामुळे बिबटे मनुष्यवस्तीकडे येऊन मोठ्या प्रमाणात पशुहत्या तसेच मनुष्यावरही बिबट्या हल्ले करू लागल्याचे प्रकारही अनेक ठिकाणी घडलेले आहेत. त्यामुळे येडगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेले बिबट्याचे हल्ले यामुळे पाळीव प्राण्यांचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. वनखात्याने ताबडतोब त्याची दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा लावण्याची तसेच नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर, येडगाव सरपंच गणेश गावडे, ग्रा. सदस्य नरेश नेहरकर यांनी केली आहे.