शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

राजगुरूनगर परिसरात बिबट्याचे बछडे आढळले मृतावस्थेत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 1:02 PM

कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हे बछडे मृत झाले असून त्याच्या शरीरावर फाडल्याच्या आणि ओरबाडल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराजवळ असलेल्या सातकरस्थळ येथे सहा ते आठ महिन्याचे बिबट्याचे बछडे शेतात शुक्रवारी (दि. ६ ) सकाळी मृतावस्थेत आढळून आले आहे. या परिसरात काही दिवसापासून बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरिकांनी सांगितले होते. हे अखेर खरे ठरले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये अधिकच घबराट पसरली आहे. नागरिकांच्या जीवाला धोका असताना वनखात्याचे मात्र दुर्लक्ष असून अद्यापही बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावलेला नाही.          सातकर स्थळ (पश्चिम ) येथे गेल्या काही दिवसापासून बिबट्या या परिसरात वावरत असल्याचे शेतकरी व नागरिक यांच्या निदर्शनास आले होते. तसेच तिन्हेवाडी -सांडभोरवाडी (ता खेड ) या परिसरात काही दिवसापुर्वी बिबट्याने हल्ला करून एका कालवडीचा फडशा पाडला होता. तिन्हेवाडी -सांडभोरवाडी व सातकर स्थळ हा परिसर लगतच आहे. सातकर स्थळ येथे चार दिवसापुर्वी बिबट्या नागरिक व शेतकऱ्यांच्या निर्दशनास आला होता. या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. खेड वनविभाग मार्फत आज (दि ६ रोजी ) १० वाजता बिबटयाचा वावर असणाऱ्या पारिसरात पिंजरा बसविण्यात येणार होता. मात्र सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सातकरस्थळ ( पश्चिम ) येथील शेतकरी नाना नवले यांच्या घराजवळील मक्याच्या शेतामध्ये बिबट्याचे नर जातीचे, सुमारे ६ ते ८ महिने वयाचे बछडे मृतावस्थेत आढळून आले आहे.त्यामुळे या परिसरात बिबट्याचे कुटुंब वावरत असल्याचा संशय खरा ठरला असून नागरिकांमध्ये अधिकच घबराट पसरली आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.मात्र यापुर्वी वनखात्याने याची कोणतीही दखल घेतली नाही.वन परिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत बछडे  ताब्यात घेतले व पंचनामा केला.हे बछडे मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हे पिल्लू बछडे झाले आहे. त्याच्या शरीरावर फाडल्याच्या आणि ओरबाडल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत असे बछड्याचे शवविच्छेद केल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगेे यांनी सांगितले. काल गुरुवारी रात्री सातकरस्थळ ( पश्चिम ) येथील पाचारणे वस्तीकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावर, दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने उडी घेतली होती. मात्र उडी चुकल्याने हा तरुण बचावला. बिबट्याची मादी आणि दोन बछडे या परिसरात वावरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या तरुणावर झेप घेणारा बिबट्या म्हणजे ही मादीच असावी, असा या भागातील लोकांचा संशय आहे. आतातरी प्रशासनाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी माजी उपसरपंच राजेंद्र थिगळे यांनी केली आहे .

टॅग्स :Khedखेडleopardबिबट्याDeathमृत्यूforestजंगलFarmerशेतकरी