राजुरी (पुणे) : येथील उंचखडक परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. उंचखडक येथील धोंडीभाऊ कोंडीबा कणसे यांच्या गोठ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कणसे यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक धास्तावलेले आहेत. येथील पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या अनेक घटना घडलेल्या असून त्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.