पुणे : पुणे जिल्ह्यात राजगुरूनगर तसेच जुन्नर भागातबिबट्याचा वावर कायम दिसतो. पण आता हेच बिबटे पुणे शहराच्या जवळपास दिसू लागले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होतेय. पुण्यात कोंढवे धावडे येथील एका सोसायटीच्या परिसरात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहराच्या जवळ पुन्हा बिबट्याचा वावर दिसला.
या बिबट्याच्या हालचाली सीसीटिव्हीमध्ये दिसत आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र वनविभागाच्या केलेल्या शोध मोहिमेत तो बिबट्या नसून रान मांजर असल्याचे सांगितले. तर सुरक्षा रक्षकाच्या दाव्यानुसार तो बिबट्या आहे असं सांगितले जातेय. या बिबट्याचे १० मार्चला पहाटे दर्शन झाले होते.