पुणे: भीमा खो-यातील पंचवीसपैकी १५ धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून सात धरणात शून्य टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांनी तळ गाठल्याने शेतीसाठी नाही तर पिण्यासाठीही पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यातच मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे दुष्काळाची तिव्रता अधिक जाणवू लागली आहे. मात्र, पुणे शहर व परिसराला पाणी पुरवठा करणा-या वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणात ३.५५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील भीमा व कृष्णा खो-यातील बहुतांश धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. त्यात पुणे जिल्हा व परिसरातील काही भागाला पाणी पुरवठा करणा-या भीमा खो-यातील २५ पैकी वडीवळे, आंद्रा आणि खडकवासला धरणात ३५ ते ४० टक्के पाणीसाठा आहे. तर पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड, टेमघर,नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून उजणी धरणातील मृतसाठाही वापरला जात आहे. त्यामुळे उजणीत उणे ५४.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भीमा खो-यातील २५ पैकी माणिकडोह, येडगाव, विसापूर, कळमोडी, चासकमान,भामा आसखेड,पवना,कासारसाई, मुळशी, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर, वीर धरणात २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.त्यातील काही धरणांमध्ये 5 ते 10 टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे.उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बाष्पिभवनामुळे पाणीसाठ्यात घट होत आहे.पाऊस लांबल्यास नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे,असे जलसंपदा विभागातील अधिका-यांकडून सांगितले जात आहे.-------------------------------------
खडकवासला धरणा प्रकल्पात 3.55 टीएमसी पाणी पुणे शहर व परिसराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण प्रकल्पांतर्गत येणा-या टेमघर धरणात दुरूस्तीच्या कारणामुळे शून्य टक्के पाणीसाठा आहे.त्यामुळे सध्या वरसगाव,पानशेत आणि खडकवासला धरणातील पाणीसाठ्यावरच अवलंबून रहावे लागत आहे.खडकवासला धरण प्रकल्पात सध्या केवळ 3.55 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.येत्या जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी धरणात उपलब्ध असल्याने पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही,असे जलसंपदा विभागाकडून सांगितले जात आहे.
भीमा खो-यातील धरणांची पाणीसाठ्याची टक्केवारी धरण टक्केवारी पिंपळगाव जोगे ०.०० माणिकडोह १.०६येडगाव ५.७६ वडज ०.०० डिंभे ०.०० घोड ०.०० विसापूर ३.२४कळमोडी १८.०९ चासकमान ३.७० भामा आसखेड ८.८७ पवना १९.८० कासारसाई १०.०२मुळशी ६.६५टेमघर ०.०० वरसगाव ८.०८ पानशेत १६.०४गुंजवणी १०.५३ निरा देवधर १.७९ भाटघर ५.५५ वीर ३.६७नाझरे ०.०० उजनी (उणे)-५५.३४-------वडीवळे ३५.११ आंद्रा ४०.८५खडकवासला ४१.०१ ---------------------------