लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोहगाव विमानतळावरील पार्किंग शुल्क ८० रुपयांवरून कमी करून ३० मिनिटांसाठी ३० रुपये व १ तासासाठी ५० रुपये करणार असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. लोहगाव विमानतळ विकास प्राधिकरणाच्या आढावा बैठकीनंतर कार्गो सुविधेचे उद्घाटन शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार जगदीश मुळीक, विमानतळ संचालक अजयकुमार, मराठ चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅँड अॅग्रीकल्चरचे महासंचालक अनंत सरदेशमुख आदी उपस्थित होते. शिरोळे म्हणाले, ‘‘विमानतळ येथील नवीन कार्गो सुविधेमुळे ४० हजार टन मालवाहतुकीची सोय उपलब्ध झाली आहे. नवीन विस्तारासाठी आवश्यक अशा २० एकर जागेची पाहणी करण्यात आली असून, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने ती निश्चित करण्यात येईल. तसेच विमानतळावरील उपलब्ध जागेवर स्थानिक व्यावसायिकांना संधी देणे, विमानतळावर वृक्षारोपण, सौर ऊर्जा प्रकल्प, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी डॉग स्कॉड, नो-पार्किंगचे बोर्ड प्रत्येक १०० मी.वर लावणे आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
विमानतळावरील पार्किंग शुल्क कमी
By admin | Published: June 28, 2017 4:25 AM