पुणे : मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने आठवी आणि दहावी पास उमेदवारांना रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षण देण्यात येणार आहे. उत्पादन, रिटेल आणि आॅटोमोबाईल यांसारख्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचे दार त्यामुळे खुले होणार आहे.एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. एमसीसीआयएचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष गिरीश बापट, कार्यवाह सुजला वाटवे, अस्पायर नॉलेज अॅण्ड स्कील्स इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी, एमईएस गरवारे महाविद्यालयाचे डॉ. आनंद लेले या वेळी उपस्थित होते.अस्पायर नॉलेज कंपनीच्या सहकार्याने एमसीसीआयएच्या भोसरी येथील केंद्रात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०१९-२० या कालावधीत ५० लाख कौशल्यक्षम रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्या अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मध्यम स्वरूपाच्या उद्योगांची गरज लक्षात घेऊन कौशल्यक्षम प्रशिक्षण उमेदवारांना देण्यात येणार आहे. या वर्षी प्रत्येकी २५ उमेदवारांचे ३ वर्ग घेण्यात येतील. या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून, उद्योगांमध्ये रोजगार संधीदेखील उपलब्ध करून दिल्या जातील. गेल्या आर्थिक वर्षात ८०० उमेदवारांना कौशल्य शिक्षण देण्यात आले असून, त्यातील ९० ते ९५ टक्के उमेदवारांना रोजगार मिळाला असल्याची माहिती डॉ. सरदेशमुख यांनी दिली.याच उपक्रमांतर्गत एमईएस गरवारे महाविद्यालयात बीबीए शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० तासांचा विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आला आहे. यात ४० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. उद्योगाविषयीचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा हा या मागे हेतू असल्याचे डॉ. लेले म्हणाले.ज्ञानप्रबोधिनी घेणार उद्योजकता कलचाचणीव्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक क्षमता, कल, प्रेरणा आणि जोखीम स्वीकारण्याची वृत्ती आवश्यक असते. तसेच त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करणे आणि निर्णयक्षमता असणे महत्त्वाचे असते.उमेदवारांमध्ये नक्की कोणते गुण आहेत, उद्योजकतेसाठी पूरक क्षमता त्यांच्यात आहे की नाही, याची कलचाचणी ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने केली जाणार आहे.पदवीपूर्व, पदव्युत्तर विद्यार्थी, व्यवस्थापन व उद्योजकता यासंबंधी अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना ही कलचाचणी उपयोगी ठरेल. एमसीसीआयएच्या सहकार्याने हे मार्गदर्शन केंद्र चालविण्यात येणार आहे.
रोजगारक्षम कौशल्य शिक्षणाचे मिळणार धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 1:14 AM