पुणे : राज्यातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या चार दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चित्रपट कौशल्य आत्मसात करता यावी यासाठी फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या वतीने लघु चित्रपट अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात एफटीआयआय आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँंड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी) मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला आणि बार्टीचे डायरेक्टर जनरल कैलास कानसे यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या. या करारानुसार अभिनय, डिजिटल छायाचित्रण, पटकथा लेखन आणि टिव्ही लेखन याविषयांचे वीस दिवसीय अभ्यासक्रम एफटीआयआयमध्ये घेण्यात येणार आहे. याशिवाय दहा दिवसांचा स्मार्टफोनवर फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रमही राबविण्यात येणार आहे. एफटीआयआयच्या स्किलिंग इंडिया इन फिल्म अँंड टेलिव्हिजन ( स्किफ्ट) या उपक्रमांतर्गत हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत २५ शहरांमध्ये ८५ अभ्यासक्रम राबविण्यात आले असून, पंधरा महिन्यात ४००० विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. बार्टीबरोबरचा हा करार महत्वपूर्ण असून यानिमित्ताने दुर्गम भागातील विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल समाजघटकांना जागतिक चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांची दालन खुली होण्याची संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर मधील मागासवर्गीय विद्याथर््यांची निवड दोन्ही संस्थाकडून केली जाणार असल्याची माहिती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी दिली.
राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळणार चित्रपट कौशल्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:14 IST
अभिनय, डिजिटल छायाचित्रण, पटकथा लेखन आणि टिव्ही लेखन याविषयांचे वीस दिवसीय अभ्यासक्रम एफटीआयआयमध्ये घेण्यात येणार आहे.
राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळणार चित्रपट कौशल्याचे धडे
ठळक मुद्देएफटीआयआय आणि बार्टीमध्ये सामंजस्य करार दहा दिवसांचा स्मार्टफोनवर फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रमही राबविण्यात येणार २५ शहरांमध्ये ८५ अभ्यासक्रम राबविण्यात आले असून पंधरा महिन्यात ४००० विद्यार्थ्यांना याचा फायदा