पुणो : अवकाशात प्रयोगशाळा का तयार करतात, अंतराळ मोहिमेत सहभागी होण्यासाठी काय करावे, सर्वच धूमकेतू सृष्टीला हानिकारक असतात का, एखाद्या पदार्थाप्रमाणो प्रसरण पावल्यावर विश्वाची घनता कमी होते का, कृष्णविवर अस्तित्वात आहे का, अवकाशातील प्रदूषण कसे थांबवावे, मंगळयान मोहिमेचे नेमके उद्दिष्ट काय, ब्रrांडाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे का, आदी प्रश्नांवर उत्तर देऊन ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी विद्यार्थिनींना अवकाश संशोधनाचे धडे दिले.
निमित्त होते रोटरी क्लब ऑफ पुणो मिडटाऊनच्या वतीने म. ग. ए. सोसायटीच्या हुजूरपागा प्रशालेत ‘अंतराळ संशोधनातील भारताचे योगदान’ या विषयावर आयोजित मुक्तसंवाद कार्यक्रमाचे. याप्रसंगी ज्येष्ठ संशोधिका मंगला नारळीकर, किशोर अदमाने, अलका काकतकर उपस्थित होत्या. लॉजिकल थिअरम्स वापरून गणितातील लहान लहान गोष्टी शोधून काढा, प्रश्न विचारायला शिका, गणित विज्ञानात गोडी निर्माण करा, असे मंगला नारळीकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा हिरवे व आभार साक्षी गाडेकर हिने मानले. (प्रतिनिधी)
4गणित शालेय वयात कठीण वाटत असला तरी त्यातील विविध तर्कपूर्ण पद्धतींनी त्यात अनेक गमती करता येतात. त्या शिकून गणिताला मजेशीर विषय बनवा व त्याचा आनंद घ्या. गणित हा आवडीचा विषय असला तरी वडील गणिताचे प्राध्यापक असल्याने पुस्तकी ज्ञानाशिवाय इतरही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. गणितातील गंमत सांगताना 4 वेळा वापरून 7 कसा दाखवायचा हे नारळीकर यांनी सांगितले.