पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे मोडी लिपी आणि कागदपत्रे पडताळणी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. येत्या ५ जानेवारीपर्यंत विद्यापीठातील इतिहास विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.शासकीय कार्यालयांमध्ये मोडी लिपीतील अनेक कागदपत्रे उपलब्ध आहेत. मात्र, ही कागदपत्रे वाचनासाठी मोडी लिपीचे जाणकार व्यक्ती सहजासहजी मिळत नाहीत. त्याचप्रमाणे मोडी लिपीतील पुरातन ग्रंथ आजही ग्रंथालयांमध्ये संशोधकांची वाट पाहात आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या इतिहास विभागाने मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही शाखेतील इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकेल. मोडी लिपीचे वर्ग येत्या ९ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत घेतले जातील. केवळ ५0 विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश दिले जातील. तसेच या अभ्यासक्रमासाठी ५०० रुपये शुल्क आकारले जाईल.अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. पुराअभिलेखागारातील उपक्रमासाठी ५0 गुणाची परीक्षा होईल. लेखी परीक्षेत व पुराअभिलेखागारातील परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येकी ४0 गुण मिळणे आवश्यक आहे.
विद्यापीठाकडून मोडी लिपीचे धडे
By admin | Published: December 30, 2016 4:51 AM