नारायणगाव : राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना पक्षात घेण्यापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल असे आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांना दिल्यानंतर तुर्त तरी सर्व पदाधिका-यांना दिलासा मिळाला आहे.आमदार शरद सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चेमुळे जुन्नर तालुक्याचे सर्व पदाधिका-यांनी सोनवणे यांच्या पक्ष प्रवेशास विरोध केला होता. नारायणगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तालुक्यातील मुख्य पदावर असलेल्या पदाधिका-यांनी सामुयिकरित्या राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यानंतर मंगळवारी (दि ५) प्रमुख पदाधिकारी मातोश्रीवर गेले होते. त्यावेळेस उध्दव ठाकरेयांनी दबावतंत्राला दाद न देता पदाधिका-यांनी कानउघडणी केली होती. सोनवणे यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा न झाल्याने पदाधिकारी मागे फिरले होते.बुधवारी आशाताई बुचके यांनी प्रमुख पदाधिका-यांसमवेत मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत उध्दव ठाकरे यांनी शरद सोनवणे यांना पक्षात या आश्वासनामुळे शिवसेनेतील पदाधिका-यांना दिलासा मिळाला आहे.शिवसेनेच्या तिकीटावर दोन वेळा आमदार झालेले बाळासाहेब दांगट यांनी सन २००६-०७ मध्ये कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेची सर्व सुत्रे आशाताई बुचके यांच्याकडेआली होती. गेली १२ ते १३ वर्षे शिवसेनेची धुरा त्या सांभाळत आहेत.सन २००९ व सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या वतीने बुचके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर नगर परिषद, पंचायत समिती व अनेक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचेवर्चस्व आहे. जिल्हा परिषदेच्यासात पैकी तीन जागांवर वर्चस्व मिळविण्यास यश मिळाले होते. एक जागा एका मतावरून गेली होती.मध्यंतरी प्रकृती अस्वस्थामुळे त्या सक्रीय नव्हत्या मात्र नंतर पुन्हाजोमाने सक्रीय होवून जुन्नर तालुका पिंजून काढला होता.सन २०१९ ची विधानसभा निवडणूक ही त्यांची महत्वाची व शेवटची निवडणूक होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची उमदेवारी मिळावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत.>सोनवणे यांच्या शिवसेनेत प्रवेशाआधी पदाधिका-यांशी चर्चा होणार असली तरीही प्रवेश देण्यास उध्दव ठाकरे यांनी नकार दिला नसल्याने सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोनवणे हे शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचेशी चर्चा करणार असल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून समजते. सोनवणे हे मुळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत असताना ते उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यामुळे अनेक शिवसैनिक त्यांच्या प्रवेशाबाबत उत्सुक आहेत.
"सोनवणेंच्या पक्षप्रवेशापूर्वी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:42 AM