शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

शाळांवर फौजदारी दाखल करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 5:23 AM

शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार शाळांना शालेय शिक्षण समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे; मात्र अनेक शाळा बैठक घेत नसल्याने विद्यार्थ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार शाळांना शालेय शिक्षण समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे; मात्र अनेक शाळा बैठक घेत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल अनास्था असल्याचे दिसून येत आहे. दुर्दैवाने शालेय वाहनास एखादा अपघात झाला आणि शाळेने समितीची बैठक घेतली नसेल, तर संबंधित शाळेवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे चालक व सहायक यांची कार्यशाळा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना आजरी यांनी हा इशारा दिला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत या वेळी उपस्थित होते. आजरी म्हणाले की, शालेय वाहतूक नियमावलीची अंमलबजावणी ही निरंतर प्रक्रिया आहे. यात शिक्षण विभाग, वाहतूक पोलीस आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. या सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. नियमावलीची अंमलबजावणी केल्याने विद्यार्थी वाहतुकीची सुरक्षितता वाढते; मात्र यासंदर्भात पालकांमध्येदेखील उदासीनता दिसून येते, तर दुसरीकडे शालेय शिक्षण समितीच्या बैठका शाळांमध्ये नियमित झाल्यास सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल. बैठका न घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार शिक्षण विभागाला आहेत. कार्यशाळेबद्दल माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, या कार्यशाळेमध्ये रोटरी क्लबतर्फे मोफत आरोग्य तपासणी होणार आहे; तसेच सहभागी व्यक्तींचा मोफत एक लाखाचा विमाही काढून दिला जाणार आहे. ज्या शालेय वाहतूकदारांनी अद्यापही वाहनांची तपासणी करून घेतली नाही, त्यांना शेवटची संधी म्हणून शिबिरामध्ये फेरतपासणी करून दिली जाईल. हे शिबिर शनिवारी दुपारी तीन वाजता औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी सभागृहात होणार आहे. दरम्यान, शहरात ३ हजार ७०० शालेय वाहतूक करणारी वाहने असून, त्यापैकी १२०० तपासणी न केलेल्या वाहनांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत.