पुणे : पंढरीची वारी म्हणजे...भक्तितत्वाचा आविष्कार...प्रेमसुखाची अनुभती म्हणजे पंढरीची वारी…याच वारीचा आनंद १० जूनपासून वारकऱ्यांना घेता येणार आहे. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांची १० जून रोजी पालखीचे तर ११ जून रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान होणार आहे. यंदा मॉन्सूनही १० जून रोजी महाराष्ट्राच्या दारी येणार असल्याने हा पालखी सोहळा आनंदाची वारी ठरणार आहे.
जीवनातली सारी दुःख, यातना, विसरून आनंद डोह बनून आनंदतरंग अनुभवण्याची स्थिती म्हणजे पंढरीची वारी असते. या आनंदाच्या डोहात वारकरी चिंब भिजून कित्येक किलोमीटरचा प्रवास लिलया पार करत विठोबाचे दर्शन घेतात. पालखीने प्रस्थान ठेवल्यानंतर काही दिवसांतच वरूणराजाचे आगमन होत असते. यंदा मॉन्सून १० जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळे पालखीचे प्रस्थानही याच दिवशी आहे. विठूमाऊली यंदा पाव रे आणि जोरदार पाऊस पाड रे, अशीच मनोकामना वारकऱ्यांच्या मनोमनी असणार आहे.
जगदगुरू संत तुकोबा महाराज पालखी
१० जून : प्रस्थान देहू११ जून : आकुर्डी
१२,१३ जून : पुणे१४ जून : लोणी काळभोर
१५ जून : यवत१६ जून : वरवंड
१७ जून : उडंवडी गवळ्याची१८ जून : बारामती
१९ जून : सणसर२० जून : आंथुर्णे
२१ जून : निमगाव केतकी२२ जून : इंदापूर
२३ जून : सराटी२४ जून : अकलूज
२५ जून : बोरगाव२६ जून : पिराची कुरोली
२७ जून : वाखरी२८ जून : पंढरपूर
संत तुकोबा पालखीचे उभे रिंगण
- २५ जून : माळीनगर, २७ जून : बाजीराव विहीर, २८ जून : पादुका आरतीगोल रिंगण
- १९ जून : काटेवाडी, २० जून : बेलवंडी, २२ जून : इंदापूर, २४ जून : अकलूज
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी
११ जून : प्रस्थान आळंदी
१२, १३ जून : पुणे१४,१५ : सासवड
१६ जून : जेजुरी१७ जून : वाल्हे
१८, १९ जून : लोणंद२० जून : तरडगाव
२१ जून : फलटण२२ जून : बरड
२३ जून : नातेपुते२४ जून : माळशिरस
२५ जून : वेळापूर२६ जून : भेंडीशेगाव
२७ जून वाखरी२८ जून : पंढरपूर
संत ज्ञानोबा पालखीचे उभे रिंगण
- २० जून : चांदोबाचा लिंब, २७ जून : बाजीरावी विहीर, २८ जून : पंढरपूर
गोल रिंगण
- २४ जून : पुरंदवडे, २५ जून : खुडूस फाटा, २६ जून : ठाकूरबुवाची समाधी, २७ जून बाजीरावची विहीर.