शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वाचून झालेले ज्ञान करुया दान ; एकलव्य संस्थेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 16:50 IST

गाव तिथे ग्रंथालय या उपक्रमासाठी पुस्तके संकलन करण्याच्या उपक्रमाचे आयाेजन फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यता आले हाेते.

पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी व सांस्कृतिक विकासासाठी कार्यरत असणाऱ्या एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउद्देशीय संस्थेकडून पुस्तक संकलन माेहीम राबविण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जुनी पुस्तके, रद्दी, फर्निचर, कम्युटर तसेच कपाटांचे संकलन करण्यात आले. गाव तिथे ग्रंथालय ही चळवळ या उपक्रमाच्या माध्यमातून चालविण्यात येते. 

या उपक्रमाला प्रतिसाद देत पुणेकरांनी  ३,००० पुस्तके तसेच फर्निचर जमा केले. गाव तिथे ग्रंथालय चळवळीसाठी चालवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या ह्या चळवळीमार्फत उच्च शिक्षणासाठी कार्यशाळा व युवा प्रेरणा केंद्रांत संसाधने उपलब्ध केली जातात. विविध शहरांतून आजवर घेण्यात आलेल्या पुस्तक संकलन मोहिमांमधून ३० हजाराहून जास्त पुस्तके विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातील ३० हुन अधिक ग्रंथालयांत पोचवली गेली आहेत. मागील दोन वर्षांपासून पुणेकरांनी ह्या उपक्रमास भरभरून मदत केली आहे. राज्य सरकारच्या ट्रान्सफॉरमिंग महाराष्ट्र स्पर्धेत टीम एकलव्यला ह्या कल्पनेसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीपल्स चॉईस पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

नुकत्याच यवतमाळमधील घाटंजी येथे एकलव्य अकॅडमीची तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. वंचित घटकांतील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी ह्यात सहभाग घेतला. एकलव्यमार्फत दुर्गम भागातील ४० हून अधिक विद्यार्थ्यांना ह्यामार्फत टाटा समाजविज्ञान संस्था, अजीम प्रेमजी विद्यापीठ यांसारख्या संस्थांत प्रवेश मिळवून देण्यात यश आले आहे. 'संकलानातून मिळणाऱ्या मदतीतून हे उपक्रम विस्तारण्याचा व जनतेकडून लोकचळवळीसाठी पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रभर नेण्याचा संस्थेचा मानस आहे असे संस्थेचे अध्यक्ष राजू केंद्रे यांनी याप्रसंगी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेFargusson Collegeफर्ग्युसन कॉलेजsocial workerसमाजसेवक