वाघोली : महिलांनी सक्षम होत स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला नक्कीच उद्योग व्यवसायात खडतर श्रमातून भरारी घेतील आणि आपले कुटुंब, गाव, जिल्हा, राज्य आणि देश आर्थिकदृष्ट्या समृद्धीकडे नेतील असा अशावाद या वेळी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार यांनी अनघा महिला बचत गटाच्या २०० महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सचिव महिलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
अनघा महिला विकास मंडळ यांच्या वतीने महिला स्वयं सहायता समूह गटांची स्थापन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सातव यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या समूह गटाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांच्या हस्ते केले. अध्यक्षस्थानी वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, आव्हाळवाडीच्या सरपंच ललिता आव्हाळे उपस्थित होत्या.
याप्रसंगी पंकज पातणकर, महिला उधोजक रेश्मा शेख, माधुरी पसेकर, लताताई जाधव, उद्योजक विकास केंद्र अधिकारी सुरेश उमाप, पंढरीनाथ पठारे, शिवदास उबाळे, किशन जाधव, बाळासाहेब शिंदे, युवा उद्योजक गणेश सातव, उषाताई आव्हाळे, अलका कड, वनिता बहिरट उपस्थित होते.
फोटो ओळ : बचत गटाच्या मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करताना सुजाता पवार.