पुणे : देशभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. प्रत्येक जण कोरोनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणे महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारशक्ती संतुलित ठेवण्यासाठी हर्बल, आयुर्वेदिक औषधे बीव्हीजी लाईफ सायन्सच्या वतीने विकसित करण्यात आली आहेत. ही औषधे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी फायदेशीर ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही औषधे रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी कशी परिणामकारक ठरतात यावर अधिक मार्गदर्शन करण्यासाठी बीव्हीजीचे संस्थापक संचालक हणमंतराव गायकवाड लोकमत इव्हेंटफुल पेजवर आपल्याशी संवाद साधणार आहेत.
सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवणे आवश्यक आहे. हर्बल उत्पादनांचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम कसा होतो? या उत्पादनांमध्ये कोणत्या खास गुणधर्मांचा समावेश आहे ? उपचार पद्धती कशी घ्यावी ?
आरोग्य यंत्रणा व प्रतिकारक्षमता उत्तम होण्याकरिता काय करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला गायकवाड यांच्या संवादातून मिळणार आहेत. तसेच ''शतप्लस'' हर्बल टॉनिक चे विविध फायदे कसे होतील. याची माहीतीदेखील मिळणार आहेत. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य माहिती मिळवण्यासाठी शनिवारी (दि. २२) ऑनलाईन नक्की या संध्याकाळी 5.30 वाजता फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर.