पुणे : सामजिक संस्थांच्या आणि महापालिकेच्या प्रयत्नातून निश्चित कोरोना संकटावर मात मिळवता येईल, असे मत महापौर मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केले.
सेव्ह द चिल्ड्रन-बाल रक्षा भारत या संस्थेने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लहान मुल व माता यांच्या सोबत हँडवॉश प्रकल्प राबविला आहे. ज्यातून साबणाने हात धुण्याचे फायदे आणि कोरोना व इतर संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी साबणाने हात धुण्याचे महत्व सांगितले जात आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून संस्थेतर्फे ''कारवान व्हॅन'' हा कोरोना जनजागृतीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाचा श्री गणेश करण्यात आला. महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिटकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, आरोग्य प्रमुख आशिष भारती तसेच सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे महाराष्ट्र वरिष्ठ व्यवस्थापक इप्सिता दास, हरीश वैद्य आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे महापलिका आणि संस्था या पुढेही एकत्र येऊन अश्या सामाजिक प्रश्नानवर जे जे शक्य आहे आहे ते करेल. पुणे भागातील जवळपास १५ वॉर्डमध्ये राबविला जाणार आहे. उपक्रमाचा मुख्य उद्देश लोकांना लसीकरणाबाबत माहिती देणे, मास्क वापरणे, हात धुणे, अंतर ठेऊन बोलणे व कोरोनाच्या संक्रमणाला आळा बसवणे हा आहे.
--
राज्यात ''कारवान व्हॅन'' उपक्रम
सुमारे ८५ दिवस चालणारा आणि पालिकाक्षेत्रातील ११० वार्ड आणि जिल्हा परिषद क्षेत्रातील ८१५ गावे या ''कारवान व्हॅन'' उपक्रमांतर्गत नाशिक, मुंबई, मालेगाव, मावळ या भागांमध्ये सुद्धा आजपासून राबविण्यात सुरुवात झाली आहे.